वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असून प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत क्लब हाऊस असून या क्लब हाऊस जवळ अतिशय सुरक्षित अंतरावर covid-19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण उत्तम रित्या होऊ शकते .
यासाठी वाघोली मध्ये गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांताराम कटके यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
आहे.खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सोमनाथ आव्हाळे, संभाजी पवार,बापूसाहेब दातार,गणेश कूलथे,संतोष सातव, दिलीप इंगळे,अबीद शेख,देविदास गाडे, बशीर सैय्यद, विक्रम वाघमारे, अनिकेत पवार,युवराज निफानकर,गणेश श्रीवत,निलेश कूरूप आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली तालुका हवेली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू असून या लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, नागरिकांना लस घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असतानाच वाघोली मध्ये लोकसंख्येचा विचार करून जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे असल्याने वाघोली मधील वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या नागरिकांसाठी तातडीने लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा वाघोली चे माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शांताराम कटके यांनी सांगितले की शासनाच्या परवानगीने वाघोली मधील गृहनिर्माण संस्थेत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी तातडीने लसीकरणाचे लाभ मिळवून देण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील याबाबत जास्तीत जास्त लवकर लसीकरण मोहीम प्रभावी करून लसीकरण केंद्र सोसायटी धारकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे .