पुणे :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केलेली लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारी भारुडे, गौळणी, लोकगीते…. लोककलेचा महिमा सांगणाऱ्या व सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या भित्तिपत्रकांचे प्रदर्शन…. महाराष्ट्राची लोकधारा, लोकपरंपरा यांना उजाळा देणारी नेत्रदीपक नृत्ये…. सामाजिक समस्यांवर भाष्य करणारी एकपात्री प्रयोग व लघुनाट्ये…. अशा उत्साही वातावरणात सृजनोत्सव स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सृजनोत्सव २०२४ या कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणात शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी परिषदेचे संचालक राहूल रेखावार, सहसंचालक डॉ. शोभा खंदारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.गीता शिंदे, सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.निलिमा तिखे , निर्मलाताई थोपटे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या चव्हाण, उपसंचालक रमाकांत काटमोरे, डॉ. कमलादेवी आवटे, ज्योती शिंदे, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.नेहा बेलसरे, सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागाचे विषय विभाग प्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे निकाल
वकृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक – डॉ.योगेश सुरवसे , द्वितीय क्रमांक – सरस्वती सूर्यवंशी, तृतीय क्रमांक – डॉ.राजेश गोरे.
वेशभूषा स्पर्धा- प्रथम क्रमांक – सुशील शिवलकर, द्वितीय क्रमांक – अनुजा कदम, तृतीय क्रमांक – डॉ.रत्ना गुजर.
निबंध स्पर्धा – प्रथम क्रमांक – पुनीत मातकर, द्वितीय क्रमांक – डॉ. दत्तात्रय थिटे, तृतीय क्रमांक – वैशाली जहागिरदार.
पोस्टर मेकिंग स्पर्धा – प्रथम क्रमांक – विनया भोसले, द्वितीय क्रमांक – डॉ. गीतांजली बोरुडे, तृतीय क्रमांक – डॉ. संगीता महाजन.
गीतगायन स्पर्धा – प्रथम क्रमांक – संकेत मोरे, द्वितीय क्रमांक – तिलकराज कोटियाना, तृतीय क्रमांक – धम्मरत्न वायवळ.
वैयक्तिक नृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक – उषा पोटकुळे, द्वितीय क्रमांक – नम्रता परब, तृतीय क्रमांक – डॉ. रत्ना गुजर.
सांघिक नृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक – मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरण, द्वितीय क्रमांक – पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , तृतीय क्रमांक – विद्या प्राधिकरण.
भूमिका अभिनय – प्रथम क्रमांक – डॉ. रत्ना गुजर, द्वितीय क्रमांक – डॉ.विशाल तायडे, तृतीय क्रमांक – राधा अतकरी.