आळेफाटा/बेल्हे : आळे (ता. जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्रीक्षेत्र आळे ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांणी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे या ठिकाणी असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्रीक्षेत्र आळे ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निघत असते.
यावर्षी अतिशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत असून, प्रस्थानाची महापूजा शिवनेरभूषण हभप राजाराम महाराज जाधव व सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते करण्यात आली. श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हतुजी सहाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नयना डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान ठेवले.
या प्रसंगी उपाध्यक्ष संजय शिंदे, सचिव अविनाश कुऱ्हाडे, चारूदत्त साबळे, संतोष पाडेकर, माजी अध्यक्ष गिरीष कोकणचे, संजय खंडागळे, व्यवस्थापक कान्हु पाटील कुऱ्हाडे, विलास शिरतर, बाळासाहेब शेळके, गिरीश कोकणे, ऍड. सुदर्शन भुजबळ, गोरक्ष गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे,ज्ञानदेव सहाने,बाजीराव निमसे, महेंद्र पाडेकर, माधव टकले, पालखी सोहळ्याचे कार्याध्यक्ष नागेश कुऱ्हाडे वारकरी उपस्थित होते.