कोलंबो – श्रीलंकेने जाफना भागातील तामिळी नागरीकांसाठी भारताच्या कर्जाच्या मदतीने रेल्वे सेवा सुरू केली आहे. जाफनला राजधानीच्या कोलंबो शहराशी जोडणारी ही लक्झरी रेल्वे सेवा आहे. रविवारी या रेल्वे सेवेचे उदघाटन झाले.
त्यासाठी 386 किमी अंतराचा स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारण्यात आला आहे. भारताने यासाठी श्रीलंकेला एसी डिझेल मल्टिपल युनिट पुरवले आहेत. ते कर्जाऊ स्वरूपातील आहे. या उद्घाटनाच्या रेल्वे गाडीतून श्रीलंकेचे परिवहन मंत्री पवित्र वन्नीराचची यांनी प्रवास केला. त्यांचे कोलंबोत भारतीय उपउच्चायुक्त विनोद जेकब यांनी फोर्ट स्टेशन मध्ये स्वागत केले.
या रेल्वे सेवेमुळे जाफना भागातील तामिळी नागरीक देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील असा विश्वास जेकब यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी दिलेल्या मदतीबद्दल श्रीलंका सरकारने भारताचे आभार मानले आहेत.