मेलबर्न – आयसीसी महिला विश्वचषक टी-20 स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यांत श्रीलंकेने बांगलादेशवर 9 विकेटने मात करत या स्पर्धेतल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद साखळीच्या अखेरच्या सामन्यात केली.
श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत बांगलादेशचा डाव 8 बाद 91 वर रोखला. त्यामध्ये निगार सुलतानच्या 39 आणि साजिदा इस्लाम व फर्गाना होक या दोघींच्या प्रत्येकी 13 धावांचा समावेश होता. श्रीलंकेच्या शशिकला श्रीवर्धनेने 16 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर अचनी कुलसुरियाने 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
Shashikala Siriwardena’s World Cup best and Kulasuriya’s two for 19 saw Bangladesh slip up in their final match of the #T20WorldCup.
SL seal nine-wicket victory!
BAN 91-8 (Siriwardena 4-16, Kulasuriya 2-19)
SL 92-1, 15.3 ovs(Hasini Perera 39*, Athapaththu 30) #LionessRoar pic.twitter.com/pGdzjBV8UB— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) March 2, 2020
श्रीलंकेने हे आव्हान 15.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यामध्ये हसिनी परेराच्या 39, कर्णधार चमारी अटापट्टूच्या 30 आणि अनुष्का संजीवनीच्या 16 धावांचा समावेश होता. नाहिदा अख्तरला 18 धावांत एकमेव विकेट घेता आली.