दुबई – सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होणारी लढत दोन्ही परदेशी खेळाडूंमध्ये रंगणार आहे. हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर व राजस्थानचा स्टिव्ह स्मिथ या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्येच नेतृत्वाचा सामना आज रंगणार आहे.
हैदराबाद विरूध्द राजस्थान हा सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे . तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं लागला आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#SRH have won the toss and they will bat first against #RR at Dubai.#Dream11IPL #SRHvRR pic.twitter.com/DM5Tgl2Nqt
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
स्पर्धेत आतापर्यंत राजस्थानने 6 सामन्यापैकी 2 सामन्यात विजय मिळविला आहे, तर दुसरीकडे हैदराबादने 6 सामन्यापैकी 3 सामन्यात विजय मिळविला आहे.