जामखेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी प्रभाग १३ मध्ये स्वखर्चाने किटक व जंतूनाशक औषधे फवारणी करण्यास सुरुवात केली आहेकोरोना विषाणूचे आयुर्मान लक्षात घेता, प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनासुद्धा खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी व एकमेकांसोबत संपर्क टाळणे, हाच प्राथमिक व प्रभावी उपाय असल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
त्या पृष्ठभूमीवर जामखेड नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती व नगरसेवक अमित चिंतामणी प्रभाग क्रमांक १३ मधील रस्त्यांवर जंतुनाशक फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभागातील अंतर्गत भागात एक ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असून फवारणीसाठी ३०० लीटर क्षमता असलेले प्रोटेक्टर मशीनद्वारे किटाणू व जंतुनाशक (सोडियम हाइपोक्लोराईड) औषधीचा वापर केला जात आहे.मेन पेठ ,कोर्ट रोड,परीट गल्ली,सोनार गल्ली ,जुनी स्टेट बँक परिसर आदी भागात पिनू राऊत,सुमित खांडवीकर,निखिल कुलथे, कार्यकर्त्यांनी औषध फवारणी करून घेतली .