लखनौ – भारताच्या महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने एक अनोखा विक्रम केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत एकाही महिला अथवा पुरुष क्रिकेटपटूने धावांचा पाठलाग करताना सलग 10 सामन्यात अर्धशतक झळकावले नाही. स्मृतीने ही कामगिरी करत विक्रमाची नोंद केली.
केवळ महिलाच नाही तर पुरुष क्रिकेटपटूंनाही तिने मागे टाकले आहे. सलग दहा सामन्यात 10 अर्धशतक करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात स्मृतीने 64 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या. यात 10 चौकार व 3 षटकार अशी फटकेबाजी केली.
स्मृतीची कामगिरी (धावा)
67 विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 15 मार्च 2018
52 विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 18 मार्च 2018
86 विरुद्ध इंग्लंड – 6 एप्रिल 2018
53 (नाबाद) विरुद्ध इंग्लंड – 12 एप्रिल 2018
73 (नाबाद) विरुद्ध श्रीलंका – 11 सप्टेंबर 2018
105 विरुद्ध न्यूझीलंड – 24 जानेवारी 2019
90 (नाबाद) विरुद्ध न्यूझीलंड – 29 जानेवारी 2019
74 विरुद्ध वेस्ट इंडिज – 6 नोव्हेंबर 2019
80 (नाबाद) विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 9 मार्च 2021