जस क्रिकेट अकादमी करंडक स्पर्धा आजपासून

स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी

पुणे – युनायटेड स्पोर्टस क्‍लब (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली) आणि जस क्रिकेट अकादमी तर्फे जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्रकाश टिंगरे मैदान, धानोरी येथे 14 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सेंट्रल रेल्वे(पुणे)च्या क्रिकेट विभागाचे सचिव आणि रणजीपटू पराग मोरे म्हणाले, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांशी जोडले जाणे हा एक आनंददायक अनुभव असतो. त्यातच जेव्हा असे उपक्रम गुणवान खेळाडूना लक्ष ठेवून केलेले असतात.

या स्पर्धेच्या माध्यमातून गुणवान खेळाडूंना आपले कौशल्य दखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या स्पर्धेत व्हिजन क्रिकेट अकादमी, जस क्रिकेट अकादमी(अमनोरा), किरण क्रिकेट अकादमी, बारणे क्रिकेट अकादमी, डिझायर स्पोर्टस कॉर्पोरेशन, संजय क्रिकेट अकादमी, जस क्रिकेट अकादमी(धानोरी), एफ3 क्रिकेट अकादमी, विभास क्रिकेट अकादमी नाशिक, युनायटेड स्पोर्टस क्‍लब अशा 10 संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

स्पर्धा 20 षटकांची घेण्यात येणार असून यामुळे कुमार स्तरावर अधिक चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सहभागी 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविले जाणार आहेत. हे सामने दिवस व रात्र या दोन वेळात खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक अशी पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांनादेखील आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.