पुणे – चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ब गटात अखेरच्या साखळी सामन्यात ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने सलग चौथ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
धायरी येथील डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ओजस कदाडी(३-१८) याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमी संघाने बार्शी तालुका क्रिकेट अकादमी संघाचा ६ गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना ब्रिलियंटसच्या ओजस कदाडी(३-१८), रणवीर चव्हाण(२-४), स्टिफन शिरोडकर(२-१०) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजी पुढे बार्शी तालुका क्रिकेट अकादमीचा (बीटीसीए) डाव १६.१ षटकात ५९ धावांवर संपुष्टात आला. यात प्रथमेश डोईफोडे १७, अनुकप्ल जाधवार १३ यांनी थोडासा प्रतिकार केला.
हे आव्हान ब्रिलियंटस स्पोर्टस अकादमीने १२.१ षटकात ४ बाद ६१ धावा करुन पुर्ण केले. यात श्रेय असलेकरने नाबाद २२ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.