पुणे – यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोकण टायगर्स, बारामती किंग्ज् इलेव्हन, ससून इलेव्हन, टायटन्स् इलेव्हन, विनायक हॉस्पिटल इलेव्हन आणि यंग डॉक्टर्स लीग संघ अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अकादमी-सिंहगड रोड, स्केलअप अकादमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अकादमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर सुरू आहे. तुषार शेंडे याच्या फलंदाजीच्या जोरावर बारामती किंग्ज् इलेव्हनने यंग डॉक्टर्स लीग संघ ड संघाचा ८ गडी राखून पराभव केला.
अनिकेत सोनावणे याच्या नाबाद ४३ धावांच्या जोरावर ससून इलेव्हन संघाने जहांगीर टायटन्स् संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. झहीर तुर्की याच्या ४४ धावांच्या खेळीमुळे विनायक हॉस्पिटल इलेव्हन संघाने यंग डॉक्टर्स लीग संघाचा ७० धावांनी सहज पराभव केला. पराग भोले याच्या फलंदाजीच्या योगदानामुळे टायटन्स् इलेव्हनने पीसीएमसी शिवशक्ती संघाचा ८ धावांनी पराभव केला.
निलेश पाटील याच्या अष्टपैलू खेळीमुळे यंग डॉक्टर्स लीग संघ अ संघाने समर्थ कराड संघाचा १५ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली. नितीन भगत याच्या नाबाद ३५ धावांच्या जोरावर कोकण टायगर्स संघाने केसीटीएस पालघर संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला.