शाळा बंद संपास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे जिल्ह्यातील संप यशस्वी झाल्याचा संघटनांचा दावा

पुणे – शिक्षक शिक्षकेतर तसेच सरकारी व निमसरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठ  पुणे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी व शिक्षकेत्तर समन्वय समितीने आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेने सोमवार तारीख 9 सप्टेंबर या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. त्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर यांचा संप यशस्वी झाला आहे.

भोर  व वेल्हा तालुक्यांमध्ये हा एक दिवसाचा लाक्षणिक संप शंभर टक्के यशस्वी झाला असल्याची माहिती भोर वेल्हा तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीने दिला. राज्यातील अनुदानित ,विनाअनुदानित  तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे .

राज्य सरकारने शिक्षकांच्या  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षक संघटना ही 11 सप्टेंबर पासून बेमुदत संपाची हाक या निमित्ताने दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत आधी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती व कर्मचारी संपात सहभागी झाली.

भोर तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे  400 पदाधिकारी  व कर्मचारी यांची औपचारिक सभा  व भाषणे पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये होऊन पंचायत समितीचे अधिकारी सोनवणे साहेब यांना याबाबत निवेदन देऊन शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने पुढील निवेदन भोरचे तहसीलदार अजित पाटील  यांना निवेदन देऊन शासनाकडे आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळेस यावेळेस भोर तालुका  शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे सुदामराव ओंबळे मिलिंद खोपडे ,प्रमोद निगडे, पंढरीनाथ शिंदे, महेंद्र शिंदे ,प्रवीण नांदे,चांगदेव  मसुरकर ,पंडित गोळे ,महेंद्र सावंत ,संदीप दानवले, विजयकुमार थोपटे,राम टापरे आदी पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)