पाच मुलांची आई असलेली तरुणी आहे स्टेनगन्सची शौकीन

वॉशिंग्टन: केसी केरी हे तिचं नाव आहे. तिला ऑनलाईन विश्‍वात “शस्त्रांच्या दुनियेतली मिस अमेरिका’ म्हणून ओळखले जाते. आपल्या इन्स्टाग्रामवर केसी सातत्याने विविध शस्त्रांसहितचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करते कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेनगन्स बाळगणं आणि धडाधड गोळ्या मारणं, ह तिचा जगावेगळा छंद आहे. विशेष म्हणजे, ती पाच मुलांची आई असूनही तिचं हे वेड कमी झालेलं नाही आणि तिचा आयुष्याचा जोडीदार नील केरी तिला वेगवेगळ्या मेकच्या स्टेनगन्सची माहिती देत असतो.

केसी केरीला लहानपणापासूनच स्टेनगनमधून धडाधड वेगाने सुटणाऱ्या गोळ्यांविषयी आकर्षण होते. ऐन तारुण्यात तिने बंदूक चालवणे शिकून घेतले आणि आपसूकच ती शस्त्रांच्या प्रेमात पडली. सध्या तिच्या उटाहमधल्या घरात वेगवेगळ्या क्षमतेच्या आणि बनावटीच्या स्टेनगन्सचा साठा आहे. खूप सारी शस्त्रं घरातच असल्यानं आणि सर्वच अत्याधुनिक शस्त्रं स्वत:ला चालवता येत असल्यानं केसीला आपण सर्वाधिक सुरक्षित असल्याचं वाटतं.

तिचे इन्स्टाग्राम पेज @BuffCoockie या नावानं असून ती सातत्याने आपले आक्रमक अवतारातले फोटो त्या पेजवर शेअर करते. या पेजला तिला 33 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असून, त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. अमेरिकेत अगदी लहान मुलांच्या हातात आता बंदुका आल्या असून शाळेमध्ये मुलांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनांची संख्या वाढत असताना, केसीने अशा प्रकारे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा छंद का जोपासला, असे विचारता केसी सांगते की, बंदुकीतून सुटणारी गोळी ही अमेरिकेची समस्या नसून लहान मुलांमध्ये अतिशय लहान वयात येणारे नैराश्‍य हे या हिंसाचाराचे मुख्य कारण आहे. मला पाच मुले असूनही त्यांच्यापैकी कोणालाही बंदूक चालवून पहाविशीही वाटत नाही, हे विशेष.


डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सहमत

साधारणपणे पन्नासच्या दशकात देशभरातील मेंटल हेल्थ सेंटर्स बंद करण्यात आल्याने सामाजिक अस्वास्थ्य वाढले असल्याकडे नुकतेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. बंदूक ही अमेरिकेची समस्या नसून तीचा ट्रिगर दाबणारा हात, ही अमेरिकेची मुख्य समस्या बनल्याचे ट्रम्प्स यांचे मत केसी केरीला पूर्णपणे मान्य आहे. सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची सर्वाधिक गरज अमेरिकेला आहे, असेही केसी सांगते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)