पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
चिंबळी – मोई (ता. खेड) परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी सुरक्षा म्हणून पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी माजी सरपंच पल्लवी गवारी यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली आहे.
मोई परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झोपी गेले पाहून संधी साधून दुचाकी वाहनाचे बॅटरी, पेट्रोल, ध्वनीपेक्ष इतर वस्तू लंपास करत आहेत. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी काही घराचे दरवाजे वाजविवणे, तसेच बाहेरून कडी लावण्याचे प्रमाण वाढले आहेत. तर 10 ते 12 घरातून मोबाइल चोरी गेले आहे. या भुरट्या चोरट्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक त्रस्त झले आहेत.
रात्रीच्या वेळी इंद्रायणी नदीच्या पुलावर दारू पिऊन दुचाकीवर व पायी येणाऱ्या व जाणाऱ्या ग्रामथ्यांना अडवून लुटण्याचे प्रमाण ही वाढले असल्याने पोलिसांच्या वतीने गस्त वाढविण्याची मागणी माजी सरपंच पल्लवी गवारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, माजी सरपंच अनुराधा गवारी, बाळासाहेब गवारी सादिक गवारी, संतोष गवारी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.