नवी दिल्ली – मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे प्रॉडक्शन असलेला “स्पायडर मॅन- नो वे होम’ भारतात 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मार्व्हलचा हा 27 वा सिनेमा आहे. स्पायडर मॅनच्या लीड रोलमध्ये टॉम होलांड दिसणार आहे.
स्पायडर मॅन म्हणजेच पीटर पार्कर आहे, हे रहस्य या सिनेमात सर्व नागरिकांना समजणार आहे. आपल्या पूर्वीच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न स्पायडर मॅन करताना आपल्याला बघायला मिळणार आहे.
मात्र, याच वेळी त्याच्या गायिका असलेल्या मैत्रिणीचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदललेले असणार आहे. सर्वसामान्य माणूस बनण्यासाठी स्पायडर मॅन एका डॉक्टरची मदत घेतो. मात्र, या प्रयोगामुळे या दोघांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो.
त्यातून बाहेर पडण्यासाठी स्पायडर मॅनला काय काय दिव्य करावे लागते, याची कथा म्हणजे “नो वे होम’ असणार आहे, टॉम होलांडच्याबरोबर झेंदया, बेनेडिक्ट कंबरबॅच, जॉन फेवरेव, जॅकोब बटालोन आणि मारिसा टोमेई हे नेहमीच्या लीड रोलमध्ये दिसणार आहेत.
मार्व्हलचा सिनेमा म्हणजे ऍनिमेशनची आतषबाजी असते. त्यात स्पायडर मॅन सारख्या सुपरहिरोची कथा म्हणजे ऍक्शनचा फुल्ल धमाका असणार हे नक्की. नाताळच्या मुहुर्तावर भारतातील बालगोपाळांना ही एक चांगली मेजवानी असणार आहे.