पाठपुराव्याला यश ः सरपंचांसह ग्रामस्थांनी केली पाहणी
चिंबळी – मोई ते निघोजे (ता. खेड) या चार ते पाच किलोमीटर रस्त्याच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 63 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अखेर मोई गावचे सरपंच राहुल गवारी यांनी रस्त्याच्या कामाला गती मिळावी म्हणून सतत पाठपुरवा केला.
अखेर त्यांच्या पाठपुरव्यास यश आले असून, गेल्या दोन दिवसांपासून कामाला गती मिळाली आहे. या कामाची पाहणी सरपंच राहुल गवारी, मारुती येळवंडे, आनंद गवारी यांनी नुकतीच करून रत्स्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे अशा सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. या रस्त्याच्या कामाला गती मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.