मुंबई : प्रत्येकाला आपल्या स्वप्नातलं हक्काचं घर असावं असं वाटत असत..त्यासाठी आयुष्यभर कष्ट घेण्याचीही तयारी असते. असेच आयुष्यभर कष्ट घेऊन निस्वार्थपणे समाजाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या या सुखद धक्क्याने या व्यक्तीच्या आयुष्याला मोठा आधार मिळाला आहे.
सोशल मीडियावर इडली अम्माने प्रसिद्ध असणाऱ्या आजीबाईंना आनंद महिंद्रा यांनी दिलेले वचन पूर्ण केले आहे. ते वचन त्यांनी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने पूर्ण केले आहे. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला स्वतःचं हक्काचं नवीन घर मिळालं आहे आणि हे आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केलेल्या वचनामुळे सत्यात उतरले आहे.
Immense gratitude to our team for completing the construction of the house in time to gift it to Idli Amma on #MothersDay She’s the embodiment of a Mother’s virtues: nurturing, caring & selfless. A privilege to be able to support her & her work. Happy Mother’s Day to you all! pic.twitter.com/LgfR2UIfnm
— anand mahindra (@anandmahindra) May 8, 2022
तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल या केवळ एक रूपयात इडली विकतात. दिवसेंदिवस महागाई वाढत गेली पण त्यांनी आपल्या इडलीची किंमत वाढवली नाही. त्या त्याच दरात लोकांना इडली खावू घालत राहिल्या. आनंद महिंद्रा यांनी 10 सप्टेंबर 2019 मध्ये इडली अम्माचा एक व्हिडिओ शेअर केला होता. “इडली अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करणं आणि त्यांना चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देणार असल्याचे सांगितले. “, त्यानंतर जेव्हा महिंद्रा यांच्या कंपनीतील काही लोक इडली अम्माला भेटायला गेले तेव्हा त्यांनी नव्या घराची इच्छा व्यक्त केली. त्यांची ती इच्छा आनंद महिंद्रा यांनी आता पूर्ण केली आहे.
इडली अम्माला नवीन घर दिल्याची माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन दिली आहे. “मदर्स डे निमित्त मला इडली अम्माला घर द्यायचं होतं. त्यासाठीचं बांधकाम वेळेत पूर्ण झालं. इथून पुढेही त्या असंच लोकांना त्यांच्या आवडीची इडली खावू घातलीत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. मदर्स डेच्या शुभेच्छा”, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले. आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी देखील गरजुंना आणि होतकरू तरुणांना त्यांच्या प्रतिभा शक्तीसाठी मदत केली आहे.