मुंबई – बॉलिवूड सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी नेहमी वेगवेगळी प्रयोग करत असतात. सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत किंवा आपली फॅशन हीच आपली स्टाईल आहे. हेच त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. मात्र यातून कधी त्यांचे चाहत्यांकडून कौतुक होते तर, कधी त्यांना ट्रोल केले जाते. सध्या गंगुबाई काठियावाडी, आरआरआर हे चित्रपट तसेच रणवीर कपूर सोबत लग्न या विषयांमुळे चर्चेत असणाऱ्या आलिया भट्टला फॅशन स्टाईलमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
बॉलीवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक्स अनेकदा व्हायरल होतात. अलीकडे नवविवाहित अभिनेत्री आलिया भट्टचा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीचा ड्रेस, हेअरस्टाईल आणि चाल पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. आलियाने तिच्या एअरपोर्ट लुकसाठी फ्लेर्ड पॅंटसह ऑफ डीप नेक व्हाइट क्रॉप टॉप आणि ओव्हरसाईज Gucci जॅकेट घातला आहे. तोंडावर मास्क, डोळ्यांवर गोल चष्मा आणि नीटनेटके बन शेपच्या हेअरस्टाईलमध्ये अभिनेत्री दिसत आहे. अभिनेत्रीचा हा एअरपोर्ट लूक पाहून दीपिकाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दीपिका याआधीच अशाच पेहरावामध्ये दिसून आलेले आहे. त्यामुळे आलियाने दीपिकाला कॉपी केल्याचे दिसून येत आहे. यावरून आलिया चांगलीच ट्रोल होताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला युजर्सनी दीपिकाची कॉपी केल्याबद्दल तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने ‘गरीबाची दीपिका’ तर दुसऱ्याने ‘दीपिका वाव’, ‘दीपिका कॉपी’ असे म्हणत अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.