केप कॅनव्हरल (अमेरिका) – चंद्र आणि मंगळावर अंतराळवीर आणि अंतराळ संशोधनाची सामुग्री पाठवण्यासाठी विशेष मेहनतीने विकसित केले गेलेले “एसएनबी’ हे अंतराळ यान आज चाचणीदरम्यान कोसळले.
हे यान एयान मस्क यांच्या “स्पेसएक्स’ कंपनीद्वारे विकसित करण्यात आले होते. टेक्सासमधील कॅमेरोन प्रांतातील प्रक्षेपण केंद्रामध्ये बुधवारी या अंतराळ यानाची चाचणी घेतली गेली. अंतराळ यानाने सर्व निकष अपेक्षेप्रमाणे पूर्ण केले होते. ठरलेल्या वेळी या रॉकेटने उड्डाण देखील केले. मात्र पृथ्वीवर पुन्हा उतरण्याच्यावेळी इंजिनने पेट घेतला आणि रॉकेट जमिनीवर कोसळले. ही या यानाची आठवी चाचणी होती.
इंधनाच्या टाकीमधील दाब कमी झाल्यामुळे टाकी पेटली. त्यामुळे “एसएनबी’कोसळल्याचे “स्पेसएक्स’ने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र “स्पेसएक्स’कंपनीचे मुख्य कार्यकारी असलेल्या एऑन मस्क यांनी यानाने सर्व परीक्षण चाचण्या यशस्वी पूर्ण केल्या असल्याचे म्हटले आहे. “एसएनबी’ कोसळल्यानंतरही मस्क यांनी “मंगळा, आम्ही येत आहोत’ असे ट्विट केले आहे.
आगामी दोन वर्षात “स्पेसएक्स’ मंगळावर मोहिम करेल, असेही मस्क यांनी म्हटले आहे. “एसएनबी’ जरी उतरण्यास अपयशी ठरले असले तरी याच यानाच्या आधारे ही मोहिम केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.