सिडनी : लौरा वोल्वार्ट हिच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
South Africa have qualified for the #T20WorldCup semi-finals!#SAvPAK pic.twitter.com/cG5KlvJ61f
— ICC (@ICC) March 1, 2020
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या १३७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघास २० षटकांत ५ बाद ११९ धावांपर्यतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून फलंदाजीत मुनिबा अलीने १२(१७), जवेरिआ खानने ३१(३४), इरम जावेदेने नाबाद १७(१८) आणि आलिया रियाजने नाबाद ३९(३२) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले.
VICTORY! 🎉SOUTH AFRICA REACH THE #T20WORLD CUP SEMI-FINALS!
The @Momentum_za Proteas Women defeat Pakistan by 17 runs to remain top of Pool B. Runs from Wolvaardt (53*) and wickets from Ismail 1/17, Van Niekerk 1/17 and Mlaba 1/20#SAvPAK #AlwaysRising #T20WorldCUp pic.twitter.com/YOfOjSJnPQ
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 1, 2020
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत नोनकुलुलेको म्लाबा (४ षटकांत २०धावा), शबनिम ईस्माइल (४ षटकात १७ धावा) आणि डेन वैन नीकर्कने (४ षटकात १७ धावा) प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना लौरा वोल्वार्टच्या नाबाद ५३(३६), मरिजेन कैपच्या ३१(३२) आणि मिगनन डू प्रीज हिच्या १७(१८) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ६ बाद १३६ अशी मजल मारली होती. पाकिस्तानकडून गोलंदाजीत डायना बेग हिने २ तर अनम अमीन, ऐमन अनवर, सैयेदा अरूब शाह आणि निदा दार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.