शिवसेनेबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा कानमंत्र

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील महा विकास आघाडीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान शिवसेनेबाबत बोलताना अजित पवारांनी, “आपल्या मित्रपक्षांबाबत मनामध्ये कोणताही गैरसमज ठेऊ नका. आपल्याला येत्या काळात एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत.” असा कानमंत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

मागील काही दिवसांमध्ये महा विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मात्र   अजित पवारांच्या आजच्या वक्तव्यामुळे राज्यातील महा विकास आघाडी भविष्यात देखील टिकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महा विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र लढणार असल्याचा निर्वाळा देखील त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे. त्यांनी ती जागा जरूर राखावी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील क्रमांक दोनच पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करावेत.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.