Aishwarya Rai Bachchan – मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटाच्या यशानंतर ऐश्वर्या राय बच्चनची फिल्मी कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने दक्षिण भारतीय सुपरस्टार चिरंजीवीचा पुढचा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहे.
वृत्तानुसार, ऐश्वर्याने आगामी प्रोजेक्टसाठी चिरंजीवीसोबत हातमिळवणी केली. मेकर्स लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. चिरंजीवी आणि ऐश्वर्या राय यांची जोडी लोकांना खूप आवडणार आहे. हा टॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट असेल, ज्याचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वशिष्ठ करणार आहेत. हा प्रोजेक्ट बिग बजेट असून अंदाजे या चित्रपटासाठी 200 कोटींचा खर्च केल्या जाणार आहे. या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
हिंदी प्रेक्षकांना टार्गेट करण्यासाठी निर्मात्यांनी चिरंजीवीच्या या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनला कास्ट केले. ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. ऐश्वर्याचे चाहत्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिचे चित्रपट चाहत्यांना आवडतात.
ऐश्वर्याच्या वर्क फ्रंट बाबत बोलायचे झाल्यास, ‘पोनीयिन सेल्वन 2’ या चित्रपटात ती दिसली होती, ज्यामध्ये तिने नंदिनीची भूमिका साकारली होती.