मुंबई – बॉलिवूडमध्ये वर्षभरात अनेक कलाकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गायक केके, सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, पुनीत राजकुमार सारख्या हरहुन्नरी कलाकारांचा हार्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू झाला. काही दिवसांआधीच अभिनेते सतीश कौशिक यांचेही निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आता सिनेसृष्टीतील आणखी एका कलाकाराचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. साऊथ अभिनेता अल्लू रमेश यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे वय 52 होते. रमेश यांच्या निधनाने तेलुगु सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते अल्लू रमेश यांच्या मृत्यूपश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशाखापट्टनम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्लू रमेश यांच्या मृत्यूनंतर तेलुगु सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. तेलुगु सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्मात्यांनी अभिनेत्याचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.