मुंबई – साउथ इंडस्ट्रीची अतिशय सुंदर अभिनेत्री, ‘सामंथा रुथ प्रभु’ एक उत्तम अभिनेत्री तसेच एक जबरदस्त फॅशनिस्टा आहे, जी तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. नुकतंच लंडन मधील एक कार्यक्रमातील तिचे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सॅमंथाने फॅशन डिझायनर ‘व्हिक्टोरिया बेकहॅम’च्या कलेक्शनमधील उंच कंबर असलेला फ्रिंज्ड स्कर्ट आणि मॅचिंग फ्रिंज्ड क्रॉप टॉप घातला होता.
तिने कार्यक्रमासाठी ‘Bvlgari’ मधील स्टेटमेंट नेकलेस, जुळणारे कानातले आणि चंकी डायमंड ब्रेसलेट देखील परिधान केले होते. सामंथाने फ्रिंज हेअरस्टाइल निवडली, ज्यामध्ये अंबाडा आणि मुकुटाच्या भागाभोवती थोडे केस लटकले होते. एकूणच यावेळी तिचा लूक सुपर दिसत होता. तिचा हा फॅन्सला प्रचंड आवडला असून, अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुमची देखील झोप उडेल. एका इंस्टाग्राम पेजनुसार, समंथा रुथ प्रभूच्या या आउटफिटची किंमत 81,307 रुपये आहे. तसेच, तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास वर्षाच्या सुरुवातीपासून समंथा व्यस्त वेळापत्रक पाळत आहे.
‘सिटाडेल’च्या प्रीमियरशिवाय, ती तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘शकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती, जो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आता ती तिच्या आगामी तेलगू रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘कुशी’ वर काम करत आहे ज्यात विजय देवरकोंडा देखील दिसणार आहे.