मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतंच प्राजक्ताने आपल्या ‘प्राजक्तराज’ या नव्या ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅण्डच्या उदघाटनाची कार्यक्रम देखील पार पडला. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी आपल्या या ब्रँडमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने देखील प्राजक्तच कौतुक केल्याचे समजते.
प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. चित्रपट,वेब सिरीज आणि मालिका अशा तिन्हही फॉरमॅटमधून तिने प्रेक्षकांची मने जिन्कली आहेत. आता ती ज्वेलरी ब्रँडच्या व्यवसायात देखील उतरली आहे. प्राजक्तराजच्या कलेक्शनमध्ये खास सोने व चांदीचे दागिने आहेत. नुकतंच प्राजक्ताने ब्रम्हपुरी महोत्सवाला हजेरी लावली यावेळेसचे काही फोटो देखील तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या महोत्सवामध्ये प्राजक्ता माळीसोबत अभिनेता सोनू सूद देखील दिसून आला. या महोत्सवामध्ये ‘प्राजक्तराज’बाबत बोललं गेल्याने तिने सर्वांचे आभार देखील मानले आहेत. तसेच सोनू सूदने आपल्या ज्वेलरीचे कौतुक देखील केले असल्याचे प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.यावेळी अभिनेत्रीने हिरव्या रंगाची सुंदर साडी आणि वज्रटिक देखील परिधान केली होती. “गळ्यातलं युनिक आहे..” असं सोनू यावेळी म्हणाला असल्याचे देखील प्राजक्ता माळीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
View this post on Instagram
यासोबतच प्राजक्ताने आपल्या ज्वेलरी ब्रँडचे पहिले प्रदर्शन विदर्भात लागणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. प्राजक्ता नुकतीच रानबाजार या वेब सिरीजमध्ये दिसली होती. तर हास्यजत्रा या शोमुळे ती घराघरात पोहचली आहे. प्राजक्ता आणि सोनू सूदचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. चाहते देखील यावर कमेंट करून विविध प्रश्न प्राजक्ताला विचहरात आहेत.