मुंबई – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘अनन्या पांडे’चे आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त तीन ते चार चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु आतापासूनच बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गनना केली जात आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी पासूनच सोशल मीडियावर अनन्याची जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचा इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात चाहतावर्ग असून, तिच्या फोटो आणि व्हिडिओला फॅन्स मोठी पसंती देत असतात.
बॉलीवूडमधील यंगस्टार आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून अनन्या पांडे हिच्याकडे पाहिलं जात. अभिनयाबरोबरच नवीन लुक आणि स्टाईलसाठीही अनन्या ओळखली जाते. तसेच तिच्या सदाबहार ट्रेंडमुळे ती सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. दरम्यान, आता अनन्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
नुकतंच एका मुलाखतीत अनन्या पांडेने इंटिमेट सीनवर मोकळेपणाने आपलं मत मांडलं आहे. एवढंच नाही, तर अनन्याला मोठ्या पदड्यावर कोणत्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन करायला आवडेल यावर देखील तिने बोलून दाखवलं आहे. सध्या अभिनेत्री या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
यावेळी अनन्या पांडेने ‘बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत मोठ्या पदड्यावर इंटिमेट सीन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढंच नाही, तर वरुण एक उत्तम अभिनेता असून तो खूपच क्यूट आहे…’ असं देखील अनन्या म्हणाली होती. ज्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी देखील अभिनेत्रीला ट्रोल करत असल्याचं दिसून येत आहे.