मुंबई : स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामाने अभिनेता सोनू सूद सध्या देशभर ओळखला जातोय. कोरोना विषाणूमुळे देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान त्याने बस, रेल्वे याच्या सहाय्याने हजारो प्रभावित स्थलांतरितांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आणि आताही त्याचा पुढाकार कायम आहे. त्याने बस, ट्रेननंतर आता चक्क विशेष विमानाने 170 मजूरांना शुक्रवारी मुंबईहून डेराडूनला पोहोचवले आहे.
हे सर्व मजूर उत्तराखंडहून मुंबईत रोजगारासाठी आलेले होते. संबंधित मजूंरानी सोशल माध्यमाद्वारे सोनूच्या #GharBhejo या मोहिमे अतर्गंत त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर सोन सूद याने त्यांना विमानाने घरी पोहच केले. या कामाबदल उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोनू सूद यांचे आभार देखील मानले आहेत.
मैं @sonusood जी का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ की उन्होंने अपने स्वयं के प्रयासों से मुंबई और आसपास के इलाक़ों में उत्तराखंड के शेष बचे प्रवासियों-जो किसी कारणवश पहले वापिस नहीं आ पाए थे-को उनके घर भेजने का प्रबंध किया। आपके इस सहयोग के लिए हम आपके सदैव आभारी रहेंगे। pic.twitter.com/iU3LZVZWVB
— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) June 6, 2020
इतकेच नव्हे तर सोनू सूद याने लॉकडाऊनमध्ये मदत केल्यानंतर निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबाला मदत करण्यास देखील सुरुवात केली आहे. सोनू सूद आणि त्याच्या टीमने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या हजारो लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरविले आहेत. गेले काही दिवस सोनू आणि त्यांची टीम प्रचंड मेहनत घेत आहेत.
दरम्यान, याआधी सोनू सूद याने केरळमध्ये अडकलेल्या 177 मुलींना देखील विमानाच्या सहाय्याने घरी पोहच केले होते. त्यांना कोची येथून भुवनेश्वर येथे आणण्यात आले होते. केरळ मधील एर्नाकुलम येथील एका शिवणकाम कारखान्यात या मुली अडकल्या होत्या.