मुंबई – ब्रिटनचा 40वा सम्राट म्हणून राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जगभरातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरलाही वेस्टमिन्स्टर अॅबीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. याबाबत सोननमने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
Westminster Abbey is ready for the #Coronation of King Charles III and Queen Camilla. pic.twitter.com/LfS3wJBK4k
— The Royal Family (@RoyalFamily) May 5, 2023
सोनमला किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेक कॉन्सर्टमध्ये खास स्पोकन वर्ड पीस देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याबद्दल पोस्टमध्ये तिने लिहिले की, “या समारंभासाठी कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरमध्ये सामील होण्याचा मला सन्मान वाटतो.” युनायटेड किंगडमच्या विंडसर कॅसल येथे 7 मे रोजी सोनम स्टीव्ह विनवूड आणि विशेष कॉमनवेल्थ व्हर्च्युअल गायकांची ओळख करून देईल.”
या कार्यक्रमात मुंबईतील दोन डब्बेवालेही त्यांच्या बंधुभावाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे वृत्तसंस्थेने सांगितले आहे. राजा चार्ल्स यांना भेट म्हणून वारकरी समाजाने बनवलेली पुणेरी पगडी आणि शाल त्यांनी सोबत घेतली आहे.
सोनम कपूरच्या वर्क फ्रंट सांगायचे झाल्यास बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून ती दूर आहे, लवकरच पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर सोनम कमबॅक करणार आहे. दिग्दर्शक शोम माखिजा दिग्दर्शित ‘ब्लाइंड’ या क्राईम थ्रिलरमधून ती पुनरागमन करत आहे. या चित्रपटातून सोनम कपूरचा लूक प्रदर्शित झाला होता.