पुणे : विश्वकर्मा शैक्षणिक समूहाचे सीईओ डॉ. बिपिन सुळे यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि परिणामकारक कार्याचा गौरव म्हणून “भारत रत्न डॉ आंबेडकर सन्मान पुरस्कार २०२3” प्रदान करण्यात आला आहे.
मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. बिपिन सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.