मुंबई –बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या लोकप्रिय ब्रिटीश मालिकेचे भारतीय रूपांतर ‘प्रेस’मधून डिजिटल पदार्पण करणार आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच एका शोमध्ये काम करताना दिसणार आहे. सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या ओटीटी पदार्पणाची माहिती दिली आहे.
सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, मी अजूनही हे खरोखर घडत आहे याची खात्री करण्याच्या प्रक्रियेत आहे!! शेवटी… बातमी बाहेर आली. सेटवर परत येणं, सर्जनशील प्रक्रियेत परत येणं, सहकलाकार आणि दिग्दर्शकांशी संवाद साधणं… एखादं पात्र जिवंत करणं खूप छान वाटतं. ZEE5 सोबत OTT पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे, आम्ही एका कुटुंबाप्रमाणे एकत्र खूप काही केले आहे. मला या शोची संकल्पना सुरुवातीपासूनच आवडली आणि ती कशी घडली याचा मला अभिमान आहे… असेही सोनाली आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
‘द ब्रोकन न्यूज’चे दिग्दर्शन विनय वैकुल यांनी केले आहे, ज्यांनी अलीकडेच नेटफ्लिक्सवर ‘अरण्यक’ या क्राईम थ्रिलरचे दिग्दर्शन केले आहे. ‘द ब्रोकन न्यूज’ या शोची कथा मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी वृत्तवाहिन्यांवर आधारित आहे. आगामी शो ZEE5 वर कधी प्रदर्शित होईल हे जाहीर करण्यात आलेले नाही. यामध्ये सोनाली सोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना, किरण कुमार यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत.