नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राणा दाम्पत्याचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याचबरोबर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दलित समाजातील असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप आठवले यांनी केला होता.
राणा दाम्पत्यावर अन्याय केल्याचा महाराष्ट्र सरकारवर आरोप करून आठवले म्हणाले आहे, ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘रिपब्लिकन पक्ष राणा दाम्पत्यांच्या पाठीशी आहे. आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी रिपब्लिकन पक्ष घेणार आहे. रिपब्लिकन पक्ष सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत आहे.
ते पुढे म्हणाले,’जर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळी राणा दाम्पत्य हे दिल्लीतून हनुमान चालीसा पठण करणार असेल तर त्यांची भूमिका ही चुकीची नाहीच. भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राजकीय हेतूने राणा दाम्पत्यावर राजद्रोहचा गुन्हा गुन्हा लावण ही बाब अत्यंत अन्यायकारक होती.’
राणा यांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती मात्र त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अन्याय करण ही मुंबई पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची होती.’ असं म्हणत आठवले यांनी राणा दाम्पत्यांना पाठिंबा दिला आहे.