सोनाक्षी सिन्हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. मोठ्या पडद्यावर तसेच सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्या लोकांची कमी नाही. म्हणुनच सोनाक्षीही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी तिचे अपडेट्स देत असते. ती नेहमीच तिचे फोटो तिच्या इंस्टा वर शेअर करत असते, जे सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सोनाक्षीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा लूक काहीसा बदललेला दिसत आहे.
फोटोंमध्ये, सोनाक्षी सोनेरी केसांनी ग्लॅमर दिसत आहे. सोनाक्षीने तिच्या सोनेरी केसांसह चांदीच्या रंगाचा ड्रेस निवडला, जो तिच्यावर एकदम खुलून दिसत आहेत.
सर्वसामान्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच सोनाक्षीचा हा लूक आवडला असून प्रत्येकजण तिच्या फोटोंवर कमेंट करून तिची प्रशंसा करत आहे. तिच्याफोटोवर वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत.
या पोस्टवर टिप्पणी करताना, अभिनेता विजय वर्माने लिहिले की, “मला माफ करा, हे मालदीव नाही.” त्याचवेळी अभिनेत्री हुमा कुरेशीने सोनाक्षीच्या पोस्टवर तिची प्रतिक्रिया ‘हॉरर’ शेअर केली आहे. कलाकार सुशांत दिवगीकरने लिहिले, “हा माझा आवडता लूक आहे.”२४ तासांपूर्वी इन्स्टावर शेअर केलेल्या सोनाक्षीच्या या फोटोंना आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. (