बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दबंग शैलीसाठी ओळखली जाते. नुकताच सोनाक्षीने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालने क्यूट पोस्ट शेअर केली आहे, सध्या ही चांगलीच व्हायरल होत आहे.
झहीर इक्बालने लिहिले आहे की, ‘काही लोक म्हणतील, सांगणे हे लोकांचे काम आहे. तू नेहमी माझ्यावर झुकतेय. अशीच गर्जत राहा आणि नेहमी हसत राहा. नेहमी आनंदी रहा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू परिपूर्ण आहेस. सोनाक्षीने यावर कंमेंट्स देतांना ईमोजी पोस्ट केली आहे.
तिच्या कंमेंट्सनंतर वरुण धवन, नुपूर सेनन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह सेलिब्रिटींनी गोंडस कमेंट्स सेंड केल्या आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांनी नेहमीच बेस्ट फ्रेंड असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आहे. आता युजर्स सोनाक्षी सिन्हा करणार इंटर रिलिजन लग्न ?असा प्रश्न विचारत आहे.
दरम्यान,सोनाक्षी नुकतीच रिलीज झालेल्या ‘दहाड’ या मालिकेत दिसली होती. या वेब शोमध्ये ती एका भयानक पोलिसाच्या भूमिकेत दिसली होती.