सोनई (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील घोडेगाव व लोहगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर सोनई पोलिसांनी छापेमारी केली. त्यामुळे अवैध धंदे करण्याचे धाबे दणाणले असून पोलिसांकडून अशीच कारवाई सुरू राहावी, अशी मागणी होत आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत इतर गावांमध्ये सुद्धा गावठी दारूचा महापूर आलेला आहे. त्यामुळे या गावठी दारूच्या धंद्यावर कारवाई कधी होणार, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे
दि. २१ मार्च रोजी रात्री १० वाजता घोडेगाव येथील चौकातील झोपडपट्टीत सुरूअसलेल्या गावठी दारुच्या अड्यावर छापेमारी करत ३० लिटर तयार गावठी दारू जप्त केली. पो. काॅ. महेंद्र पवार यांचे फिर्यादीवरून संजय एकनाथ गायकवाड (वय ४७ रा. घोडेगाव झोपडपट्टी) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत. दुसरी छापेमारी लोहगाव-घोडेगाव रोडवरील एका घराच्या आडोशाला ५००० रुपये किंमतीची ५० लिटर तयार गावठी दारू ताब्यात घेत पो. काॅ. सुनील पालवे यांचे फिर्यादीवरून अभिषेक बाळासाहेब खाडे याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राख करत आहेत.