काश्‍मिर खोऱ्यात काही तरी मोठे घडणार आहे – शाह फैसल

जम्मू  : केंद्र सरकारकडून जम्मू-काश्‍मिरमध्ये अतिरिक्‍त सैन्याचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून आता यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता माजी आयएएस अधिकारी आणि जम्मु काश्‍मीर पीपल्स मुव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल यांनी काश्‍मीरमध्ये काही तरी मोठे घडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

गृहमंत्रालयाने नुकतेच काश्‍मीर खोऱ्यात अतिरिक्‍त सैन्य तैनात केले आहे. यावर अनेकांनी चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. यावरच फैसल यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. केंद्राने काश्‍मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सैन्य का तैनात केले आहे, असे म्हटले आहे. शाह यांनी यासंबंधी एक ट्‌विट केले आहे त्यात त्यांनी, केंद्र सरकारने अचानक 100 कंपन्यांचे अतिरीक्‍त सैन्य काश्‍मीरमध्ये तैनात केले असून याविषयी कोणालाही कसली कल्पना देण्यात आली नसून 25 अ या अनुच्छेदाशी संबंधीत काही घटना घडणार आहेत का असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ही तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)