पुणे-दौंड मार्गावर आज काही रेल्वेगाड्या रद्द

तब्बल साडेतीन तासांचा ब्लॉक

पुणे – दौंड-पाटस या रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक कामामुळे शनिवारी (दि. 4) रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर साडेतीन तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे पुणे ते दौंड या मार्गावरील रेल्वे सेवेवर अंशत: परिणाम होणार असून, या मार्गावरील काही डेमू रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांना उशीर होणार आहे.

पुणे दौंड मार्गावर धावणारी डेमू गाडी (क्र. 71409 आणि 71410) रद्द करण्यात आली आहे. तसेच 10.40 वाजता बारामतीवरून पुण्यात येणारी बारामती पुणे-पॅसेंजर ही दौंडपर्यंतच धावणार आहे. तर पुण्याहून निजामाबादला जाणारी गाडी क्र. 51452 ही निजामाबाद पॅसेंजर ही दौंड येथून निघणार आहे.

याव्यतिरिक्त मुंबई-बंगळुरू उद्यान एक्‍सप्रेस 2 तास 20 मिनिटे उशिरा निघेल. तर काही रेल्वे या दौंड स्टेशनवर काही वेळासाठी थांबविल्या जाणार आहेत. यामध्ये बंगळुरू-मुंबई उद्यान एक्‍सप्रेस (45 मिनिटे), जम्मूतावी- पुणे झेलम एक्‍सप्रेस (1तास 20 मिनटे), हजरत निजामुद्दीन-वास्को एक्‍सप्रेस (30 मिनिटे) या गाड्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.