पुणे, दि. 4 -पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 6, 16, 17 आणि 20 ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द करण्यात आली आहे.
पुणे-फलटण-पुणे ही रेल्वे गाडी चार ते 23 ऑक्टोबर दरम्यान लोणंद-फलटण-लोणंद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर, याच काळात पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस ही कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर दरम्यान चालणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही सायंकाळी सात वाजता सुटेल. तसेच 20 ऑक्टोबर रोजी यशवंतपूरवरून सुटणारी यशवंतपूर चंदीगड एक्स्प्रेस व हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्स्प्रेस मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गावरून धावतील. तसेच, चार ते 23 ऑक्टोबर हुबळी दादर एक्स्प्रेस ही देखील मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गे धावेल.