नक्षलवादी हल्ल्यात भिवापुरातील जवान शहीद; 7 वर्षाचा चिमुकला झाला पोरका

नागपूर – छत्तासगढ येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात भीवापूर येथील जवान मंगेश हरिदास रामटेके (वय-40) यांना वीरमरण आले. वीर जवान मंगेश यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्र निर्मीतीचा कारखाना उद्धवस्त केला. यादरम्यान छत्तिसगढ येथील नारायणपूरमध्ये कार्रत असलेले आयटीबीपी हेड काॅंस्टेबल मंगेश रामटेके यांना विरमरण आले. नक्षलवाद्यांच्या पेरून ठेवलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात ते शहीद झाले.

मंगेश रामटेके हे 2007 मध्ये आयटीबीपी मध्ये भरती झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, 7 वर्षाचा मुलगा, आई-वडिल, बहिणी व एक भाऊ आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मंगेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.