गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३६ लाख रुपयांचे सामूहिक इनाम असलेले चार नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Gadchiroli: Four naxalites with bounty of Rs 36 lakh killed in encounter)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने प्राणहिता नदी ओलांडून शेजारच्या तेलंगणातून काही नक्षलवादी गडचिरोलीत दाखल झाल्याची माहिती सोमवारी दुपारी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या. त्यांनी सी-६० च्या अनेक तुकड्या, गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ युनिट आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे क्विक ॲक्शन टीम या परिसरात शोधासाठी पाठवण्यात आले होते.
सी-६० युनिटपैकी एक पथक मंगळवारी सकाळी रेपनपल्लीजवळील कोलामार्का पर्वतांमध्ये शोध घेत असताना, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर, परिसराची झडती घेण्यात आली त्यावेळी चार पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.
त्यांची ओळख पटली असून त्यांच्या डोक्यावर ३६ लाख रुपयांचे सामूहिक रोख बक्षीस होते.त्यांच्या ताब्यातील एक एके-४७ रायफल एक कार्बाइन, दोन देशी बनावटीची पिस्तूले, नक्षलवादी साहित्य आणि इतर वस्तूही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मृत नक्षलवाद्यांची नावे वर्गेश, मॅग्टू अशी असून ते दोन्ही वेगवेगळ्या नक्षल समित्यांचे सचिव आहेत. प्लाटून सदस्य कुर्संग राजू आणि कुडिमेट्टा व्यंकटेश अशी ठार झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत असे पोलिसांनी सांगितले.