शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना एका सैनिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
शिरीष नंदकिशोर पाटील (वय 37 वर्षे रा. मलठण फाटा, ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. भिंगार जि. नगर) असे या सैनिकाचे नाव आहे.
भारतीय सैन्य दलात असलेले जवान शिरीष पाटील सुटी घेऊन शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठणफाटा येथे आपल्या गावी आले होते. ते रस्ता ओलांडत असताना पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोरदार धडक बसली. यात शिरीष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.