पेठ – सातगाव पठार भागातील धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने सौरंग्या डोंगराला विशेष महत्त्व आहे. महानुभव पंथाचे अवतारस्वरूप व प्रवर्तक श्री .चक्रधरस्वामी व दत्तप्रभु यांचे सौरंग्या हे स्थान आहे. अश्या या सौरग्या डोंगरावर समुद्र सपाटीपासुन ४५०० फुटावर नवीन बोअर वेलला चांगले पाणी लागल्या मुळे येणाऱ्या भक्तांचा किंवा डोंगरावर राहण्यारे भविक यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई मुळे भाविक भक्तांची मोठी गैर होत होती.नवीन बोअर वेलला पाणी लागल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. बोअरवेलला मोटार बसविण्यासाठी दानशूर व्यक्तीनी मदत करुणे खुपच गरजेचे आहे. पुरुषोत्तम महानुभव (अध्यक्ष, सौरग्या देवस्थान ट्रस्ट)
एवढ्या उंचीवर दिड इंची पाणी लागल्या मुळे भाविक भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत वर असलेल्या भाविक भक्तांना डोंगराखाली असणाऱ्या एका शेतकर्यांकडून पाणी पुरुवले जात होते. पण उन्हाळ्यात पाणी कमी पडत होते. शेतकऱ्यांचे पाणी खर्चापोटी लाईटबील देवस्थान भरत होते. पण कमी पडणारे पाणी आणि भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता सौरग्या देवस्थानचे अध्यक्ष श्नी पुरुषोत्तम महानुभव यांनी बोअर खोदण्याचा निर्णय घेतला.आणि त्यांच्या या निर्णय चांगले पाणी लागल्याने योग्य ठरला आहे.
सौरग्या डोंगरावर समुद्र सपाटीपासुन ४५०० फुटावर नवीन बोअर वेलला चांगले पाणी लागल्या मुळे येणाऱ्या भक्तांचा किवा डोंगरावर राहण्यारे भविक यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एवढ्या उंचीवर दिड इंची पाणी लागल्या मुळे भाविक भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत वर असलेल्या भाविक भक्तांना डोंगराखाली असणार्या एका शेतकर्यांकडून पाणी पुरुवले जात होते.
पण उन्हाळ्यात पाणी कमी पडत होते. शेतकऱ्यांचे पाणी खर्चापोटी लाईटबील देवस्थान भरत होते. पण कमी पडणारे पाणी आणि भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता सौरग्या देवस्थानचे अध्यक्ष श्नी पुरुषोत्तम महानुभव यांनी बोअर खोदण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या या निर्णय चांगले पाणी लागल्याने योग्य ठरला आहे.
सौरंग्यावरील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात एकमुखी दत्तप्रभूंची स्थित असलेली मूर्ती.सहसा आपण तीन शीर असलेली दत्तप्रभूंची मूर्ती अनेक ठिकाणी पाहतो परंतु एकमुखी दत्तप्रभूंची मूर्ती फार कमी ठिकाणी पहायला मिळते.
सौरंग्या डोंगरास फार पुरातन असा धार्मिक इतिहास लाभला आहे. सौरत्नगिरी हे डोंगराचे मूळ नाव आहे. सौरंग्या हा त्याचा अपभ्रउंश आहे.नुकतेच सुवर्णगड असे डोंगराचे नामकरण करण्यात आले आहे. नानाशास्त्री पंडित महानुभाव यांनी सौरंग्या डोंगरावर दत्तप्रभूंची आराधना केल्याने दत्तप्रभु सौरंग्या डोंगरावर प्रकट झाल्याचा उल्लेख पुरातन ग्रंथात आढळतो.