नगर – ओबीसी नेते ना. छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थित नगर येथे क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (दि.३) फेब्रुवारी रोजी ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. ओबीसी एल्गार मेळावा उच्चांकी आणि शिस्तबद्धरीतीने पार पाड़ण्यासाठी तयारीला लागा. या मेळाव्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हास्तरीय नियोजन बैठक लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी महापोर भगवान फुलसौंदर, अंबादास गारुडकर, खंडूजी भूकन, दादा चितळकर, ऋषिकेश ढाकणे, विक्रम राठोड, सचिन गुलदगड, सुभाष लोंढे, सुधाकर आव्हाड, रमेश गोरे, निवृत्ती दातीर, राम अंधारे, ऋषिकेश ढाकणे, रामराव चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब बोराटे, शरद झोडगे, प्रशांत शिंदे, जालिंदर बोर्डे, भगवान टिळेकर, सारिका अंधारे, अशोक कोळेकर, भिवाजी आघाव, शशिकांत मतकर, जालिंदर विधाटे, संदीप बेहळे, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरुडे, विनायक ताठे आदी उपस्थित होते.
माजी आ.अभंग पुढे म्हणाले की, ओबीसी नेते ना. भुजबळ, प्रकाश बापू शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, माधवराव जानकर व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी करताना जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये प्रत्येक गावात घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांना व ओबीसी जनतेला मेळाव्यासाठी निमंत्रित करावे. कोणाची गैरसोय होणार नाही, याच्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. ओबीसी मध्ये असलेल्या सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींना, भटक्या विमुक्तांना मेळाव्यासाठी बरोबर घ्यावे. हा मेळावा उच्चांकी आणि सुरक्षित,शिस्तबद्ध होईल याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावे.
या वेळी खंडूजी भुकन, ऋषिकेश ढाकणे, अरविंद सोनटक्के(पाथर्डी),धनंजय गाडेकर(राहाता), प्रमोद मंडलिक (अकोला), अमित मंडलिक (संगमनेर), संगमनेर संजय गारुडकर नगर किशोर जेजुरकर (केडगाव), ऋषिकेश शेलार (श्रीगोंदा),दादासाहेब चितळकर(नगर), रामा अंधारे(शेवगाव), शशिकांत मतकर (नेवासा), चंद्रकांत झुरंगे (श्रीरामपूर), रमेश सानप, बाळासाहेब भुजबळ, नारायण येवले, अशोक कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.