पुणे : सोसायटीतील देखभाल खर्च आणि पाण्याच्या वादावरून सोसायटीच्या रहिवाशाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीचे अध्यक्ष आरीक, त्याच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शब्बर नासीर शेख (रा. जाएंट सोसायटी, कोंढवा) याने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोसायटीतील देखभाल खर्च आणि पाणी पुरवठ्यावरून गेल्या काही दिवसांपासून शब्बर आणि सोसायटीचे अध्यक्ष आरीक यांचात वाद सुरू होते. या कारणावरून काही दिवसांपूर्वी शब्बर आणि आरीकच्या पत्नीत वाद झाला होता. त्यानंतर आरीक आणि साथीदार सोसायटीत आले. पत्नीला शिविगाळ का केली, अशी विचारणा करून आरीक आणि साथीदारांनी शब्बरला मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केला तसेच दगडाने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक चैत्राली गपाट याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.