चिंबळी -चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेज व शांताई मेमोरियल स्कूल अँड ज्युनिअर महाविद्यालयात शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या वतीने ऑनलाइन वर्ग घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही शाळेत मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शांताई स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना करोनाविषयी जनजागृतीबाबत धडे दिले. तर विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी महत्त्व पटावे म्हणून एक चित्रपटही ऑनलाइन दाखविण्यात आला. या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनुराग जैद-पाटील, स्वाती जैद-पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन शिल्पा शिकारे, रोहित कांबळे, तेजस्वी शेटे, सुरभी बंदेकर, श्रेया बोधुले यांनी केले होते, असे प्राचार्या प्रिया बवले यांनी सांगितले.
“श्री समर्थ’मध्ये ऑनलाइन पद्धतीने चित्रकला, निबंध स्पर्धा, पेपरचे डेकोरेशन, कलाकृती, भाषणे, डान्स, भेटकार्ड, निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट कार्डवर नावे टाकून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, असे स्कूलच्या प्राचार्य टिळेकर यांनी सांगितले.
शोभा तांबे, मोनाली मुंगसे, निखील कांबळे, वैशाली पटले, वर्षा भोर, रूपाली सपकाळ, योगीता पाटील, निकीता हजारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी केले.