नवी दिल्ली – वाहन उद्योगासाठी पोषक वातावरण असणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेशाने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
उद्योगविषयक सुधारणांच्या आधारावर अर्थमंत्रालय ही यादी तयार करते. ही यादी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा राज्य आहे.
2019 साठीच्या या अहवालावर भाष्य करताना सीतारामन म्हणाल्या की, राज्यांनी आपल्या राज्यातील उद्योग विषयक वातावरण अधिक आकर्षक करण्याची गरज आहे. त्यामुळे स्पर्धात्मकता वाढेल. बांधकामाला परवानगी, कामगार कायद्यातील सुधारणा, पर्यावरणविषयक नियम, जागेची उपलब्धता, एक खिडकी योजना अशा निकषांच्या आधारावर ही यादी तयार केली जाते.