मुंबई – दिग्दर्शक ओम राऊत यांच्या “आदिपुरुष’ या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आदिपुरुषची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होत. टिझर वरून वाद झाल्यानंतर चित्रपटाच्या सीनमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली यासह बजेटमध्ये देखील वाढ झाली.
दरम्यान, या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेरसिकांना काही सवाल देखील उपस्थित केले असल्याचं दिसू आलं आहे. रावणानं सीतेचे हरण केल्यानंतचा प्रसंग ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यावरुन आता पुन्हा एक सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
रावण माँ सीता को हाथ क्यूँ नहीं लगा सका!#Adipurush in cinemas worldwide on 16th June.#KaunThaRavan @PrabhasRaju @omraut #SaifAliKhan@kritisanon @mesunnysingh #BhushanKumar#KrishanKumar @vfxwaala @rajeshnair06 @DevdattaGNage @AjayAtulOnline @SachetTandon @ParamparaTandon… pic.twitter.com/psoblV4rF0
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 13, 2023
ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, लंकाधिपती सीतेचे हरण करतात मात्र ते तिला स्पर्श न करता आपल्यासोबत घेऊन जातात. असे दाखवण्यात आले आहे. आणि याच सीन वरून प्रेक्षकांनी आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील त्या सीनसोबत आदिपुरुषच्या सीनची तुलना केली आहे. दरम्यान, रावण सीतेला स्पर्श न करता तिचे हरण कसे काय करतात याविषयी चित्रपटाच्या टीम कडून सांगितले होते. या संदर्भातील एक विडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
रावण माँ सीता को हाथ क्यूँ नहीं लगा सका!#Adipurush in cinemas worldwide on 16th June.#KaunThaRavan @PrabhasRaju @omraut #SaifAliKhan@kritisanon @mesunnysingh #BhushanKumar#KrishanKumar @vfxwaala @rajeshnair06 @DevdattaGNage @AjayAtulOnline @SachetTandon @ParamparaTandon… pic.twitter.com/psoblV4rF0
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 13, 2023
आदिपुरुषचे लेखक मनोज मुंताशिर यांनी एक व्हिडिओ शेअर करत या सीनमागील तर्क काय होता हे सांगितले आहे. मनोज यांनी म्हटलं आहे की, “सीतेचे हरण करण्यापूर्वी रावण हा त्याची सून रंभेच्या देखील प्रेमात पडला होता. तिनं रावणाला शापही दिला होता. तो असा की, रावणानं जर एखाद्या स्त्रीच्या देहाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला तर त्याच्या शरीराचे तुकडे होतील. म्हणून रावणानं सीतेचे हरण करताना ते वेगळ्या प्रकारे केले. असे मनोज यांनी म्हंटलं आहे. मात्र, त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे.