…म्हणून शोधला अप्परकट

सचिनने केला खुलासा

मुंबई – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीच्या उसळत्या चेंडूंना उत्तर म्हणून मी अप्परकट मारण्याचा मार्ग निवडला व तेव्हाच क्रिकेटमधील सध्या प्रचलित झालेल्या अप्परकटचा शोध लागला, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या फटक्‍यामागच्या प्रयत्नांचा खुलासा केला.

2002 साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या मालिकेत एन्टिनी ब्लोमोफोन्टेनच्या मैदानावर गोलंदाजी करताना सातत्याने उसळते चेंडू टाकत होता. त्याला खेळपट्टीकडूनही चांगलीच मदत मिळत होती. त्यामुळे आम्हाला धावा काढणे कठीण बनले होते. त्यावेळी थर्डमॅन व डीप पॉइंटवर क्षेत्ररक्षक ठेवले गेले नाहीत त्यामुळे आपण अशा चेंडूंवर अप्परकट करू शकतो असा विश्‍वास वाटला. तसा मी अनेकदा प्रयत्नही केला व त्यात यशस्वी झालो आणि हा नवा फटका प्रसिद्ध झाला. आज असा फटका मारणारे अनेक फलंदाज दिसतात, असे सचिनने सांगितले. 

उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी जेव्हा फलंदाजीचा पवित्रा घेतला जातो तेव्हा जर तो चेंडू आपल्या उंचीपेक्षाही वरून जात असेल तर त्याच्या खाली बॅट फटकावून अप्परकट खेळता येतो. त्या मालिकेत मी सातत्याने असे फटके खेळले व चौकारही वसूल केले. या फटक्‍यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज उसळते चेंडू टाकणे कमी करत होते असेही समजले. मात्र, या फटक्‍यामुळे मला उसळत्या चेंडूंवरही मोठे फटके कसे मारता येतील हे लक्षात आले, असेही सचिन म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.