पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची रोजची संख्या पुन्हा एकदा शंभऱीच्या आत आली आहे. आज शहरामध्ये 79 करोनबाधित रुग्णांची नोंद झाली. तर आज तब्बल 409 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे शहरात आतापर्यंत बरे झालेले रुग्णांची संख्या 85 हजार 884 इतकी झाली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 88,878 जणांना करोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 79 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 3 रुग्णांची नोंद झाली. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला.
सद्यस्थितीत शहरात 930 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 170 रुग्णांचाही समावेश आहे. आज दिवसभरात 409 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 85884 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1203 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप 966 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्हा रुग्णालयात 3 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 9) 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, बरे झालेल्या 3 रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून नवी सांगवी आणि शिंदोडी (ता. शिरूर) येथील तिघा रुग्णांना करोनामुक्त झाल्याने आज घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 18 जणांवर उपचार सुरू आहेत.