#HBD : …म्हणून सलमान खान प्रत्येक चित्रपटात होतो शर्टलेस

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा आज वाढदिवस. बॉलीवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट त्याने दिले. आजही सलमान खानची तरुण-तरुणींमध्ये मोठी क्रेझ आहे. यासोबतच अनेक वेगवेगळ्या स्टाईलही प्रसिद्ध झाल्या आहेत. सलमान खान आपल्या प्रत्येक चित्रपटात एकदा तरी शर्टलेस होतोच. पण तुम्हाला माहिती आहे का हा ट्रेंड कसा सुरु झाला?

सलमान खान पहिल्यांदा २१ वर्षांपूर्वीच्या चित्रपटात शर्टलेस झाला होता. प्यार किया तो डरना क्या? या चित्रपटात ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यात त्याने पहिल्यांदा शर्टलेस सीन दिला होता.  आजही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे जेवढे त्यावेळी होते. सलमान खान स्वतःच्या मर्जीने किंवा स्क्रिप्टची डीमां म्हणून शर्टलेस झाला नव्हता. यासंदर्भातील खुलासा सलमान खानने एका मुलाखतीत केला.

सलमान खान म्हणाला कि, ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यात मला शर्ट घालायचा होता. परंतु, शर्ट माझ्या साईजमध्ये नव्हता. चित्रपटाचे दिग्दर्शक सोहेल खानने मला शर्टलेसच स्टेजवर जाण्यास सांगितले. व मी तशीच शूटिंग केली, असे त्याने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘ओ ओ जाने जाना’ हे गाणे जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी लिहिण्यात आले होते. मात्र, निर्मात्याने ते रिजेक्ट केले. पण हे गाणे मला खूपच आवडल्याने प्यार किया तो डरना क्या? या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला, असेही सलमान खानने सांगितले.

 

View this post on Instagram

 

Work in progress…

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.