वॉशिंग्टन – रशियाने केमिकल अस्त्रांचा वापर केला तर त्या देशाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. मी गुप्तचरांच्या अहवालाविषयी बोलत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
युक्रेनमधील युध्दात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्याची रशियाची योजना आसल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेने दिला नाही. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी या अस्त्रांचा युध्दात वापर होऊ शकतो, असे म्हटले आहे.
रशियाने या अस्त्रांचा वापर अलीकडे 2020 मध्ये विरोधी पक्ष नेते यांच्यावर विष प्रयोग करून तर 2018 मध्ये सर्जी आणि युलीया स्क्रीपल यांच्यावर केला होता याकडे लष वेधले होते.